Posts

पूर्वी मी खूप नटायची, समोरच्या समीरला पाहून, गालातल्या गालात हसायची... आम्हां दोघांचे इशारे कधी टळले नाही, त्यातच प्रेम कधी झाले आमचे आम्हालाही कळले नाही... एकमेकांना समजता समजता टाके कधी जुळले, आई-बाबांना न कळविता लग्नही आमचे आम्हीच ठरवले... शेवटी आई-बाबा, कसे विसरतील आम्हालां, आले की अगदी लग्नाच्या मूहुर्ताला... लग्न झालं, संसारही थाटला, काहीच दिवसांत त्यातला अर्थही कळला, आता आमचा आनंद मावत नव्हता, कारण आम्हां दोघांत आता, नवीन मेंबर वाढणार होता.... झाडाचं पान गळाव तसे दिवस गेले, ९ महीन्यानंतर, मला हवे ते कन्यारत्नंच मिळाले... पण हल्ली समीर माझ्याकडे पाहतंच नाही, त्याचं नक्की काय भिनसलयं मला कळतच नाही... पूर्वी मी खूप नटायची, आता मुलांच्या काळजीत तेही सूचत नाही, समीरला पाहून गालातल्या गालात हसण्याइतपतं वेळही मिळत नाही... - नि.स.दळवी.
'त्याचा संवाद' मानले की, नाही समजू शकलो मी तूला, तुझ्या प्रेमाला, पण तू होतीस सोबत, माझ्यासोबत प्रत्येक क्षणाक्षणाला... मी थोडासा बावळट आहे, कदाचित तसाच राहीन, जेव्हा-जेव्हा अडचणीत येईन, तेव्हा फक्त तूलाचा पाहीन.. हो,माझी तुझ्या हाताशी, पकड थोडी हलकीच आहे, पण तूझ्यासोबतची उपरणाची गाठ, अजूनही पक्कीच आहे... व्यवहार करताना मी नेहमीच चूकतो, ४० च्या ऐवजी ४०० रुपये देतो, आणि तूझ्यासमोर मान खाली घालून उभा राहतो, पण तू मात्र माझी मान अभिमानाने वर करतेस, इतरांसारखा नाही आपला नवरा, म्हणून डोळ्यात पाणी आणतेस... आपल्या मुलांना शाळेत पोहोचवणे, इतकेही मला जमत नाही, तू मात्र सगळ आटपून, मुलांना सोडतेस, आवराआवर करतेस, पण विस्कटलेला चेहरा कधीच, आरशात पाहत नाहीस... मी तूझा पती, म्हणून तू मला नेहमीच पूजतेस, खरच गं, तू माझ्यासाठी तू किती करतेस... नाही सखे, -मला काहीच कळत नाही, अशातला काही भाग नाही, फक्त समजण्याइतपत, माझा मेंदू आता काम करत नाही, एवढचं... - वेळेप्रसंगी मी हतबल होतो, गप्प बसतो, असेही नाही, फक्त बोलून प्रतिकार करण्याइतपत, तोंडातून आता वाचा फूटत नाही, एवढचं... - पकड म
हा पाऊस असा कसा अवेळीच पडतो तिच्या आठवणींचा एक ढग उगीच मनात येऊन दाटतो - नि.स.दळवी
मला नव्हती तहान तुझी फक्त पेला रिकामा होता गाठ बांधेन म्हणतं होतो पण धागा कच्चा निघत होता - *नि।स।दळवी*
फक्त थोडा वेळ दे... सगळाच chnge होण्याचं बोलतोय... कात टाकायची आहे... मळलेली आणि घासून घासून फाटलेली कात बदलायची म्हणतोय... काही स्वप्न रेखाटली आहेत...  ती आता रंगावयाची म्हणतोय... फक्त... फक्त... थोडा वेळ दे... नुसतीच आश्वासने नाहीत माझी...  बऱ्याच दिवसांनी ; वर्षांनी म्हण हवे तर...  पण सारं जुळून येतच हळूहळू...  फक्त नीटशी मांडणी करे पर्यंत...  अगदी थोडासा वेळ दे... स्वप्नच नाहीत पहायचीत आता मला...  ती अनुभवायची आहेत...  खूप रात्री जागून काढल्या आहेत...  एक रात्र शांत झोपेची हवे आहे...  त्यासाठी थोडा वेळ दे... -नि।स।दळवी
काल ती माझ्याशी अगदी परक्यासारखी वागली... मी तुझा म्हटल्यावर चक्क हसायला लागली... -नि।स।
नाही... आपलं अगदीच तस काही नाही... पण... हल्ली जीव  एकट्यात रमत नाही -नि।स।