'त्याचा संवाद'
मानले की, नाही समजू शकलो मी तूला, तुझ्या प्रेमाला,
पण तू होतीस सोबत, माझ्यासोबत प्रत्येक क्षणाक्षणाला...
मी थोडासा बावळट आहे,
कदाचित तसाच राहीन,
जेव्हा-जेव्हा अडचणीत येईन,
तेव्हा फक्त तूलाचा पाहीन..
हो,माझी तुझ्या हाताशी,
पकड थोडी हलकीच आहे,
पण तूझ्यासोबतची उपरणाची गाठ,
अजूनही पक्कीच आहे...
व्यवहार करताना मी नेहमीच चूकतो,
४० च्या ऐवजी ४०० रुपये देतो,
आणि तूझ्यासमोर मान खाली घालून उभा राहतो,
पण तू मात्र माझी मान अभिमानाने वर करतेस,
इतरांसारखा नाही आपला नवरा,
म्हणून डोळ्यात पाणी आणतेस...
आपल्या मुलांना शाळेत पोहोचवणे,
इतकेही मला जमत नाही,
तू मात्र सगळ आटपून,
मुलांना सोडतेस, आवराआवर करतेस,
पण विस्कटलेला चेहरा कधीच,
आरशात पाहत नाहीस...
मी तूझा पती, म्हणून तू मला नेहमीच पूजतेस,
खरच गं, तू माझ्यासाठी तू किती करतेस...
नाही सखे,
-मला काहीच कळत नाही,
अशातला काही भाग नाही,
फक्त समजण्याइतपत,
माझा मेंदू आता काम करत नाही, एवढचं...
- वेळेप्रसंगी मी हतबल होतो, गप्प बसतो,
असेही नाही,
फक्त बोलून प्रतिकार करण्याइतपत,
तोंडातून आता वाचा फूटत नाही, एवढचं...
- पकड माझी अजूनही घट्ट आहे,
पायात माझ्या अजूनही ताकद आहे,
अख्खा माऊंर एव्हरेस्ट चढून उतरण्याची,
फक्त आता त्यात प्राण उरला नाही, एवढचं...
-मला हिशोब कळत नाही,
अस मुळीच समजू नकोस,
तूझ्या डोळ्यातले अश्रू दिसत नाही,
म्हणून मनात राग धरू नकोस,
सगळ कळतयं,
फक्त डोळ्यांत दृष्टी नाही,
इतकाच काय तो दोष...

"तिचा संवाद..."
नाही सख्या...
असं बोलून उगाचचं,
तूम्ही तूमचा दरारा,
माझ्या मनातील तूमच्याविषयीचे प्रेम,
मुळासकट उपटू नका,
तो भुतकाळ विसरून, हा वर्तमान,
वेळीच पचवून टाका...
तूमची अशी अवस्था मला पाहवत नाही,
पण तरीही, पुढच्या जन्मीही हाच नवरा मिळावा,
असे बोलण्याशिवाय राहवत नाही...
-आठवतं तूला,
जेजुरीच्या गडावर जाताना,
मला तू उचलून घ्यायचास,
सगळ्यांसमोर तू मला,
चक्क I LOVE YOU म्हणायचासं
-आठवतं तूला,
पावसात चिंब भिजत असताना,
तू माझ्याशी आंखमिचोली खेळायचास...
पावसाचा थेंब नेमका,
तूझ्याच डोळ्यात पडला,
म्हणून तू डाव हरून पावसावर चिढायचास...
-आठवतं तूला,
आभाळात उमटणा-या इंद्रधनुची तूलना,
तु माझ्याशी करायचास,
फक्त त्यातला काळा-पारवा रंग तूझा,
असं बोलल्यावर माझ्यापाठी पळत सुटायचास
-आठवतं तूला,
आपळ बाळं जेव्हा आलं
तेव्हा तू किती खूष झाला होतास,
तूमचा आनंद आणि पैसा यांचा
हिशोब लावत बसला होतास.
*** *** *** *** *** *** ***
-नि.स.

Comments

Popular posts from this blog