पूर्वी मी खूप नटायची,
समोरच्या समीरला पाहून,
गालातल्या गालात हसायची...
आम्हां दोघांचे इशारे कधी टळले नाही,
त्यातच प्रेम कधी झाले
आमचे आम्हालाही कळले नाही...
एकमेकांना समजता समजता टाके कधी जुळले,
आई-बाबांना न कळविता लग्नही आमचे आम्हीच ठरवले...
शेवटी आई-बाबा, कसे विसरतील आम्हालां,
आले की अगदी लग्नाच्या मूहुर्ताला...
लग्न झालं, संसारही थाटला,
काहीच दिवसांत त्यातला अर्थही कळला,
आता आमचा आनंद मावत नव्हता,
कारण आम्हां दोघांत आता,
नवीन मेंबर वाढणार होता....
झाडाचं पान गळाव तसे दिवस गेले,
९ महीन्यानंतर,
मला हवे ते कन्यारत्नंच मिळाले...
पण हल्ली समीर माझ्याकडे पाहतंच नाही,
त्याचं नक्की काय भिनसलयं मला कळतच नाही...
पूर्वी मी खूप नटायची, आता मुलांच्या काळजीत तेही सूचत नाही,
समीरला पाहून गालातल्या गालात हसण्याइतपतं वेळही मिळत नाही...


- नि.स.दळवी.

Comments

Popular posts from this blog