फक्त थोडा वेळ दे...
सगळाच chnge होण्याचं बोलतोय...
कात टाकायची आहे...
मळलेली आणि घासून घासून
फाटलेली कात बदलायची म्हणतोय...

काही स्वप्न रेखाटली आहेत... 
ती आता रंगावयाची म्हणतोय...
फक्त... फक्त... थोडा वेळ दे...

नुसतीच आश्वासने नाहीत माझी... 
बऱ्याच दिवसांनी ; वर्षांनी म्हण हवे तर... 
पण सारं जुळून येतच हळूहळू... 
फक्त नीटशी मांडणी करे पर्यंत... 
अगदी थोडासा वेळ दे...

स्वप्नच नाहीत पहायचीत आता मला... 
ती अनुभवायची आहेत... 
खूप रात्री जागून काढल्या आहेत... 
एक रात्र शांत झोपेची हवे आहे... 
त्यासाठी थोडा वेळ दे...

-नि।स।दळवी

Comments

Popular posts from this blog