शोधतो आहे...
ती अर्धवट लिहिलेली प्रेम पत्र..
तुझ्यावर लिहिलेल्या त्या साऱ्या कविता...
तुझ्यासाठी सजवलेली सारी स्वप्ने...
आणि तू भेटली होतीस ती वाट...
ती अर्धवट लिहिलेली प्रेम पत्र..
तुझ्यावर लिहिलेल्या त्या साऱ्या कविता...
तुझ्यासाठी सजवलेली सारी स्वप्ने...
आणि तू भेटली होतीस ती वाट...
शोधतो आहे...
सोबत घालवलेली संध्याकाळ...
समुद्रात वाळूवर कोरलेले तुझे-माझे नाव...
एकत्र प्यायलेले नारळाचे पाणी...
आणि ती शपथ घटलेली हजार वाचने...
सोबत घालवलेली संध्याकाळ...
समुद्रात वाळूवर कोरलेले तुझे-माझे नाव...
एकत्र प्यायलेले नारळाचे पाणी...
आणि ती शपथ घटलेली हजार वाचने...
शोधतो आहे अजूनही...
आठवणींनी जागलेल्या त्या रात्री...
वहीत जपून ठेवलेले सारी गुलाबाची फुलं...
तू दिलेल्या साऱ्या अत्तराच्या बाटल्या...
आणि तुझ्या-माझ्या बंधनाचा तो एक नाजूक धागा...
आठवणींनी जागलेल्या त्या रात्री...
वहीत जपून ठेवलेले सारी गुलाबाची फुलं...
तू दिलेल्या साऱ्या अत्तराच्या बाटल्या...
आणि तुझ्या-माझ्या बंधनाचा तो एक नाजूक धागा...
शोधतो आहे...
एक अशी खोली...
जिथे तुझी साधी आठवणही येणार नाही...
एक अशी शांतता...
जिथे तुझ्या पैंजनांचा आवाज येणार नाही...
एक असा वारा...
जिथे तुझ्या शरीराचा गंध येणार नाही...
हा... मी शोधतो आहे...
एक असं जग...
तिथे तुझ्या कुठल्याच पाऊलखुणा नसतील...
पण...
आहे का जगात अशी कुठली
जागा जिथे तुझ्या- माझ्या आठवणी नसतील...
आहे का असा कुठला वारा...
जो आपल्या दोघांना स्पर्श
करून गेला नसेल...
आहे का अशी कुठली निरव शांतता...
जी आपण भंग केली नसेल....????
एक अशी खोली...
जिथे तुझी साधी आठवणही येणार नाही...
एक अशी शांतता...
जिथे तुझ्या पैंजनांचा आवाज येणार नाही...
एक असा वारा...
जिथे तुझ्या शरीराचा गंध येणार नाही...
हा... मी शोधतो आहे...
एक असं जग...
तिथे तुझ्या कुठल्याच पाऊलखुणा नसतील...
पण...
आहे का जगात अशी कुठली
जागा जिथे तुझ्या- माझ्या आठवणी नसतील...
आहे का असा कुठला वारा...
जो आपल्या दोघांना स्पर्श
करून गेला नसेल...
आहे का अशी कुठली निरव शांतता...
जी आपण भंग केली नसेल....????
*-नि।स।*
*०४.०९.२०१७*
*०४.०९.२०१७*
Comments
Post a Comment