'त्याचा संवाद' मानले की, नाही समजू शकलो मी तूला, तुझ्या प्रेमाला, पण तू होतीस सोबत, माझ्यासोबत प्रत्येक क्षणाक्षणाला... मी थोडासा बावळट आहे, कदाचित तसाच राहीन, जेव्हा-जेव्हा अडचणीत येईन, तेव्हा फक्त तूलाचा पाहीन.. हो,माझी तुझ्या हाताशी, पकड थोडी हलकीच आहे, पण तूझ्यासोबतची उपरणाची गाठ, अजूनही पक्कीच आहे... व्यवहार करताना मी नेहमीच चूकतो, ४० च्या ऐवजी ४०० रुपये देतो, आणि तूझ्यासमोर मान खाली घालून उभा राहतो, पण तू मात्र माझी मान अभिमानाने वर करतेस, इतरांसारखा नाही आपला नवरा, म्हणून डोळ्यात पाणी आणतेस... आपल्या मुलांना शाळेत पोहोचवणे, इतकेही मला जमत नाही, तू मात्र सगळ आटपून, मुलांना सोडतेस, आवराआवर करतेस, पण विस्कटलेला चेहरा कधीच, आरशात पाहत नाहीस... मी तूझा पती, म्हणून तू मला नेहमीच पूजतेस, खरच गं, तू माझ्यासाठी तू किती करतेस... नाही सखे, -मला काहीच कळत नाही, अशातला काही भाग नाही, फक्त समजण्याइतपत, माझा मेंदू आता काम करत नाही, एवढचं... - वेळेप्रसंगी मी हतबल होतो, गप्प बसतो, असेही नाही, फक्त बोलून प्रतिकार करण्याइतपत, तोंडातून आता वाचा फूटत नाही, एवढचं... - पकड म...
Comments
Post a Comment